मालदीवचे हुकूमशाही नेतृत्व पायउतार, चीनच्या महत्त्वाकांक्षेला धक्का!
आंतराष्ट्रीय राजकारणात कुठलाही देश ना कुणाचा कायम शत्रू असतो, ना मित्र. त्यातही चीनसारख्या जागतिक महासत्ता बनण्याच्या वाटेवर असलेल्या देशाकडे दुर्लक्ष करणं, हे सोलीह यांच्या मालदीवला परवडणारं नाही. शिवाय चीनच्या कर्जाचा डोंगर एवढा अवाढव्य आहे की, त्यापासून सहजासहजी मुक्ती शक्य नाही. कर्जरूपानं घेतलेला पैसा अनेक प्रकल्पामध्ये गुंतवण्यात आला आहे. तेव्हा सोलीह यांपुढे काय पर्याय उरतात?.......